सिंहावलोकन


मागे वळून पाहतांना,
जुन्या आठवणींची काही पाने मिळाली
बऱ्याचशा पानांवर तुझेच नाव होते
काही पानांवर तुझीच छबी होती
काही पानांना तू माळलेल्या बकुळीचा गंध होता
तर काही पानांवर मी ढाळलेल्या अश्रुंचा ओलावा होता
काही पानांवर शब्द ओसंडून वहात होते
तर काही पाने नि:शब्द होती
आयुष्यातील काही क्षण पानांवर थांबले होते
तर कुठे तुझे हास्य विखुरलेले होते
तुझ्या पावलांचा पदरवं होता पानोंपानी
आणि आठवणींचा कोलाहल
आदळत होता माझ्या कानाोकानी
नंतरची सर्व पाने मात्र कोरी होती!
पण.... कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात
पैंजणं किणकिण रुणझुणत होती!!!

Comments

आपल्या वेळी प्रेमाची वाच्यता करणारे फार कमी.असे प्रेमविव्हल कवीच जास्त होते. छान कविता

By :
20/04/2023 12 : 10 : 33 PM

Good one !!!

By : Aniruddha Patwardhan
24/04/2023 8 : 51 : 08 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article