कुंकवाचा धनी


कुंकवाचा धनी

माझं कपाळ….
माझा गळा….
माझी मनगटं….!

कपाळावरील कुंकू त्याचं….
गळ्यातील मंगळसूत्र त्याचं….
मनगटांतील हिरवा चुडा त्याचा….!

त्याचं कपाळ….
त्याचा गळा….
त्याचे मनगट….!

कपाळावरील आठ्या त्याच्या….
रिकामा गळा त्याचा….
मनगटावरील घड्याळ त्याचं….!

सगळं सगळं त्याचं!!!
मग माझं काय ????
काहीच नाही!!!!

का?का???

आणि तो नसेल तेव्हा?
माझं कपाळ पांढरं….
गळा ओकाबोका….
आणि मनगटं रिकामी…..

माझं काय??
काहीच नाही???
पण का? का???

शशांक पुरंदरे

१४-०२-२०२४

Comments

वास्तवता होती. हल्ली जग बदलले आहे.

By : हेमांगी प्रदीप कुलकर्णी
15/02/2024 12 : 46 : 18 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article