लोकशाहीचा सोहळा


लोकशाहीचा सोहळा शशांक पुरंदरे

प्रसिद्द सध्या देशात सार्वत्रिक निवडणुका सुरु आहेत. अर्ध्या जागांवर मतदान झाले आहे. ४ जूनला निकाल जाहीर होतील. नेहमीप्रमाणे मतदार यादीत नावे न सापडण्याचे प्रकार होतच आहेत.

जेव्हा संगणकीकरण झालेले नव्हते तेव्हा निवडणूक आयोग निवडणुकांच्या काही महिने आधी मतदार याद्या प्रसिद्ध करत असे. साधारण एखादा महिना सुधारणांसाठी दिला जात असे. संगणक आल्यानंतर निवडणुकीच्या आधी एका महिन्यापर्यंत चुका दुरुस्त करायला मुदत असते किंवा नवीन नावे देखील समाविष्ट करता येतात. वेळोवेळी या बाबतीत निवडणूक आयोग सुचना प्रसिद्ध करत असते. असे असूनही मतदार योग्य वेळी जागे होत नाहीत आणि नंतर नावे न सापडल्यावर प्रशासकांवर आगपाखड करतात. आणि राजकीय दल या गोष्टींचे भांडवल करायला टपलेलेच असतात.

प्रत्यक्ष मतदार देखील या गोष्टींना जबाबदार आहेत ही बाब यांच्या लक्षात येत नाही. यात मतदारांची उदासीनताच दिसून येते. सध्याचे राजकीय वातावरण देखील याला जबाबदार आहे यात देखील शंका नाही.

ठाणे मतदार संघात श्री नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर लगेचच त्यांनी व्हॉटस अॅप द्वारा सर्व मतदारांना एक लिंक पाठवली जिथे तुमचे यादीतील नाव आणि मतदानाच्या जागेचा पत्ता पाहता येतो. एखादा व्हिडीओ बघायला वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळ नाव बघायला लागतो. हीच गोष्ट निवडणूक आयोगाच्य संकेत स्थळावरूनही पाहता येते. खरतर निवडणुका जाहीर होण्याच्या सुमारास प्रत्येकाने हे करणे गरजेचे आहे. पण लक्षात कोण घेतो? परत नंतर शिव्या घालायला सर्व तयार !!!!

असे म्हणतात की हल्लीची तरूण पिढी जास्ती जागरूक आहे. त्यांची आकलन शक्ती जास्ती चांगली आहे. म्हणूनच कदाचित सध्या जो काही राजकीय नंगानाच चालतो त्याबद्धल ही पिढी जास्ती उदासीन आहे, जे चांगले चित्र नाहीये. हे बदलणे गरजेचे आहे.

तेव्हा , नक्की मतदान कराच!!

अर्थात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे या गोष्टीलादेखील दोन बाजू आहेत. ज्या व्यक्तीला निवडणूक आयोगाने रीतसर मतदार ओळख पत्र दिले आहे, ज्या व्यक्तीने गेल्या निवडणुकीत मतदान केले आहे, ज्या व्यक्तीने नाव कमी करण्यासाठी वा मतदार संघ बदलण्यासाठी कधी अर्ज केलेला नाही अशा व्यक्तीचे नाव यादीतून गहाळ होणे हा अक्षम्य अपराध आहे. नागरिकाला त्याच्या मुलभूत अधिकारापासून वंचित ठेवले जात आहे. या बद्धल निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. म्हणून संबंधित लोकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. पण प्रत्यक्षात हे कधीच होत नाही.

पण जिथे काहीही अपराध नसताना लोकांना वर्षानुवर्ष तुरुंगात ठेवले जाते तिथे निवडणुका काय चीज आहे???

Comments
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article