कविराज


कविता कविता कविता!
वीट आला या कवितांचा!
उठता बसता निजता जागतां
परत तीच कविता!
रोज रोज नवीन नवीन कुठून आणायच्या कविता?
रोज रोज विचारणा, आज काय नवीन कविराज?
दोन कविता लिहिल्या काय, एकदम कविराज?
हे म्हणजे, शिपाई झाला महाराज!
आता वाटते, बंद करावे सगळे
काय लिहावे रोज वेगवेगळे?
पण मग.....
मनांत असंख्य विचार एकमेकांवर आदळत रहातात
सतत मनाच्या कवाडातून बाहेर येऊ पहातात
आणि मग कागदावर उतरवायला हात शिवशिवतात
मग आता बोला, लिहू का कविता?

Comments

Poems are important indeed !!!

By : Aniruddha Patwardhan
24/04/2023 8 : 53 : 30 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article