पाउस मनातला


आला पाऊस पाऊस
तुझ्या माझ्या ग मनांत
ओल दाटली सर्वत्र
फुला पानांत वनात

पाऊस आपला ग
सखा जीवभावाचा
खेळ खेळतो कसा ग
नाद खुळाच हा त्याचा

जातो खेळून तो खेळ
घाव देवून जिव्हारी
तरी वाटते हवीशी
दर वर्षी त्याची वारी

हाच माझा विठ्ठल
तुझा माझा पांडुरंग
कशासाठी जाऊ भेटी
घरी येता त्याची वारी

माझ्या वरील कवितेला माझी मैत्रीण वीणा कडेकर हिने चाल लावून त्याचे गाणे बनवले आहे. तेच गाणे तुमच्यासाठी !


Comments

Beautifully composed. Very nice

By : Cyril David
07/07/2023 10 : 49 : 40 AM

Mast

By : Sheetal
07/07/2023 10 : 54 : 09 AM

अतिशय सुंदर कविता

By : Pratibha Tarabadkar
07/07/2023 11 : 08 : 16 AM

Very nice poem and adjecent picture too.😊

By : Vijay Joshi
07/07/2023 12 : 09 : 06 PM

Wah 👌

By : Mona
07/07/2023 4 : 10 : 14 PM

छान.

By : Shirish joshi
07/07/2023 4 : 13 : 32 PM

रोमांचकारी पावसातून एकदम विठ्ठलावर येवून ठाकलास शशांक 🙏

By : मोहिनी चित्रे
07/07/2023 9 : 04 : 43 PM

तुला माहिती आहे मी नास्तिक आहे. पण ९९ टक्के लोकांना जर हीच भाषा समजत असेल तर त्याच भाषेत बोलायला हवे, नाही का?

By : Admin
08/07/2023 08 : 27 : 35 AM

चिमुकली पण छान !

By : Sheela Bahadkar
09/07/2023 2 : 26 : 27 PM

छान गायन.कवितेवर आधीच पोस्ट केली आहे.

By : Pratibha Tarabadkar
12/07/2023 11 : 20 : 21 AM

शशांक, सुंदर कविता जी शोभून दिसते तिच्या साधेपणामुळे, आणि सच्च्या भावनांचा आविष्कार केल्यामुळे! आणि या कवितेला वीणा ने स्वर कोंदण करून सजवलं आहे त्या बद्दल वीणा चे पण अभिनंदन आणि कौतुक!

By : Bhalchandra Shrikhande
12/07/2023 11 : 47 : 17 AM

Bhatti mast jamali aahe ! Sundar kavita, chal and gane ! Wah maza aa gaya !!

By : Raju Chitale
30/07/2023 9 : 06 : 53 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article