काही विचार


अतिरेक्याला गोळ्या घालून मारले हा अतिरेकी हल्लाच आहे असे म्हणण्याचा अतिरेक फक्त पाकिस्तानच करू शकतो.

जगावे कसे हे शिकविणारे धर्मच आज माणसाच्या जीवावर उठले आहेत असेच इस्रायल-हमास युद्धावरून खेदाने म्हणावे लागतंय.

इंग्रजांनी चोरलेली शिवाजी महाराजांची वाघनखे तीन वर्षांसाठी भाड्याने भीक मागून आणली आहेत म्हणे! केव्हढे हे शौर्य!!!

नवरात्रीतील नऊ रंग हा धंदेवाईकपणा असेलही कदचित, पण स्त्रियांनी आपली हौस पुरवली तर बिघडले कोठे? प्रत्येक गोष्टीला धार्मिक रंग का द्यावा? दही हंडी आणि गणेशोत्सवातील धंदेवाईक गोष्टी मात्र चालवून घेतात.

हे होते आजच्यासाठी काही विचार! मनात आले ते लिहिले एव्हढेच!

शुभदिवस !!!!

Comments

युद्ध करून काय साध्य होते हा प्रश्न मला नेहमीच पडतो.बलवंतांच्या अहंकारापोटी बिचारे निरपराध भरडले जातात. आज मी नवरात्रीच्या साड्यांबद्दल लिहीण्याचा विचार करतच होते.बघू आळसावर मात करून होतंय का ते!

By : Pratibha Tarabadkar
15/10/2023 11 : 58 : 15 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article