क्षण
क्षण तिथेच थांबला
जेव्हा तुला मी पाहिले
तेजोनिधी रविकिरण
क्षणभरी विसावले
तप्त उष्ण लोहबाण
चंद्रकिरण भासले
उष्ण वात क्षणार्धात
शीत लहर जाहले
मध्यांह्नी प्रातस्वर
पाखरांनी गाईले
क्षणी तरूलता वृक्ष
फुलून असे डवरले
सडे लक्ष पुष्पांचे
तव चरणी अंथरले
क्षण तिथेच थांबला
जेव्हा तुला मी पाहिले



Comments
mast
By : Ashwini
सुंदर भाव अभिव्यक्ती! छान आहे कविता
By : Bhalchandra Shrikhande
त्या क्षणाचे वर्णन छान केले आहे.
By : Pratibha Tarabadkar