वसंत
वसंत
शशांक पुरंदरे
बहावा बहरु लागला आहे
गुलमोहर झुलु लागला आहे
उन्हाळा जाळू लागला आहे
पण वसंत फुलु लागला आहे
रवि मध्यान्ही तळपतो आहे
शरीरातून घाम झिरपतो आहे
उकाड्याने कहर केला आहे
पण वसंत मात्र फुलतो आहे
आंबे महाग झाले आहेत
जेष्ठांसारखे अमेरिकेला गेले आहेत
हापूससाठी बॅंकेत कर्ज मिळत आहे
पण वसंत मात्र फुलत आहे
नेते भाषणे ठोकत आहेत
मतांसाठी भिक्षावळ फिरत आहे
औटघटकेचा मतदार राजा त्रस्त आहे
मात्र वसंत फुलला मस्त आहे
निवडणुका येणार आणि जाणार
हा जिंकणार तो पडणार
आपल्याला फरक नाही पडणार
कारण वसंत फुलणारच आहे



Comments
👍
By : राजू
सद्यपरिस्थितीच संक्षिप्त पण समर्पक वर्णन
By : दीपक टिकेकर
👌👌👌
By : Sheela Bahadkar
योग्य आणि छान वर्णन
By : योगिनी लोथे