जेष्ठ नागरिक


वाढले वय झालो
सिनियर सिटिझन
तरीही जपतो आहोत
आपण आपुले मी पण

समोरून येतसे
छान सुबक तरूणी
ह्रदयात होते टिकटिक
पाहतो मागे वळुनी

तरूण म्हणतात काका,
दिसतात अजून हॅंडसम
याही वयात आहे
फिटनेस तुमचा कायम

तरूण मुली म्हणतात
हॅलो, हाय अंकल;
मी मनाला ब्रेक लावतो
म्हणतो होऊ नकोस चंचल

जीवनाच्या प्रवाहात
वाहून गेलंय छप्पर
आता डोक्यावर आहे
एक छानसं टक्कल!

तरीही खिशातूनी
बाळगतो कंगवा अजूनी
न जाणो कधी कोणी
येईल समोरूनी!

तरुणपणी भाव खाणारी
आता हाय हॅलो म्हणते
नवरा मुलगा सासूचे
किस्से कंटाळवाणे ऐकवते

तेव्हा ग भवाने,
फुटले होते का तुझे डोळे?
होतो मी काळासावळाच
पण केस होते की कुरळे!

छान गात होतो,
क्रिकेटपण जमत होतं
तुझ्यासाठी झुरून,
कविता पण करत होतो

पण तेव्हा आवडला तुला
लाल गाडीवाला गोजिरा
ज्याच्यासाठी माळत होतीस
केसांमधे गजरा

तो मोगरी सुवास
आठंव आला सुगंधी
अंगी फुले शहारा
मनास आली धुंदी

आता काळ्या केसांवर
चढलीये झालर चंदेरी
पण त्या डोळ्यांमधे आहे
अजुनही चमक पाणेरी

मैत्रिणीं आपुल्या आता
झाल्या आहेत आज्या
खेळवतात नातवंड
निवडतांना भाज्या

पण वाढल्या वयाला
आहे उत्साहाची जोड
गेट टुगेदरसाठी ठरवतात
फॅन्सी ड्रेसकोड

जणू सुरु झाली आहे
आता दुसरी इनिंग
म्हणून तर आहे
आयुष्य अजून थ्रीलिंग!!!

महफिल जमते मित्रांची
कधीतरी संध्याकाळी
जुन्या आठवणींची
करत बसतो उजळणी

दोन लार्ज नंतर
आताच स्मॅालच भर
आपल्या प्रॅाब्लेमस् मधे
उगाच नको भर

आमच्या अर्धांगिनी
होतात मग जॅाईन
एकमेकींकडे डोळे मिचकावत
एन्जॅाज करतात वाईन

एके दिवशी येतो
तिचा जुना मित्र
उलटली साठी आपुली
तरी मन अजुनही भित्रं

पण दोनचार भेटीतच
ओळख होते मात्र
मन विसरून जाते
कोण कुणाचा मित्र

त्याची अवस्था देखील
असते आपल्यासारखीच
चार दिवसांच्या मैत्रीत
उलगडते कथा तशीच

असाच हा प्रवास
चालूदे अनंत
घाई नको कशाची
जगणे असे निवांत

Comments

Beautifully written . Kudos

By : Cyril David
24/04/2023 8 : 56 : 06 PM

सुंदर कविता! पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा !

By : Bhalchandra Shrikhande
24/04/2023 9 : 36 : 08 PM

एकदम भारी पिकली पाने हिरवी मने

By : प्रतिभा ताराबादकर
24/04/2023 10 : 58 : 15 PM

खूपच छान 😊

By : Jayu
25/04/2023 10 : 03 : 04 AM

छान कविता लिहिली आहे, एकदम मार्मिक आहेत सर्व कडवी. अनेक शुभेच्छा...!

By : समीर पेशवे
26/04/2023 5 : 57 : 50 PM

Khupach Chhan!!!! जणू सुरु झाली आहे आता दुसरी इनिंग म्हणून तर आहे आयुष्य अजून थ्रीलिंग!!!

By : Vivas
26/04/2023 6 : 58 : 05 PM

Good one! Keep it up !

By : Shirish
27/04/2023 08 : 30 : 39 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article